Sat. Apr 11th, 2026

देव बाजारचा भाजीपाला नाही रं

Spread the love

*मनी नाही भाव ???*
✍️ २८०८

एखाद्या जागेतून *देव* *निघून गेला की तो* कायमचाच निघून जातो व तेथील स्थान महात्म्य कायमसाठी संपून जाते.
कारण ? जागोजागी ह्रदयातली *माया* आटली आणी फक्त धनाची *माया* शिल्लक राहिली.
( देवासारखी माणंसही अशीच असतात ? )

पण पशुपक्षात ही ह्रदयातली *माया* अजूनही शिल्लक राहिली.

म्हणूनच साधू संत , देव गिरी कंदरी राहतो , पशुपक्षाशीं बोलतो…आणी मनुष्य वस्ती पासून दूर निघून जातो.

हिमालयात निर्जन ठिकाणी म्हणूनच महासिध्दयोगी निरंतर वास्तव्य करतात.
तिथेच खरे देवाचे ही सानिध्य असते.

*गिरनारी राहतो माझा* भगवंत….
मनुष्य वस्ती पासून दूर…
*अगदी एकटा….*

म्हणूनच *खरे भक्त*? सोडून ? देव माणसाकडे कधी जात नाही तर त्याला शोधायला माणसेच गिरनारी जातात.

*पण ? तीथे* ही तो किती जणांना भेटतो ?

*देव दिसत नाही पण* *जाणवतो मात्र* *नक्की.*

*देव भावाचा भुकेला…**
म्हणूनच *सखा श्रीकृष्ण* *फक्त राधेकडे*
राहतो…

*म्हणूनच प्रेम*
भगवंतावर करावं
माणसांवर नाही…
कारण ?
मनुष्याकडे ? *धोका* आहे …भगवंताकडे ?
*आईचं वात्सल्य*
आहे….
( *आत्मानुभूती* )

*मन चंगा तो कठौती में* *गंगा ??*

*मनी नाही भाव म्हणे* *देवा मला* *पाव ??*

*देव बाजारचा भाजी* *पाला नाही रं…*

*देव* अशान पावायचा *नाही रं…*

*विनोदकुमार महाजन*

Related Post

Translate »
error: Content is protected !!