Fri. Jul 10th, 2026

*आत्मचिंतन*

हजारो मनुष्य रूपी विषारी सापांच्या जालिम कलियुगी गराड्यात राहूनही तुम्ही छान सुखी समाधानी आनंदी रहात असाल , आनंदी जीवन जगत असाल, तर तुम्ही नक्कीच काळावर विजय मिळवून स्थितप्रज्ञ झालेला आहात आणी तुमच्या वर संपूर्ण ईश्वरी कृपेचे वरदान प्राप्त झाले आहे असे समजावे.

आणी जर तुम्ही अशा वातावरणात सतत बेचैन , अस्वस्थ आणी अस्थिर रहात असाल तर तुम्हाला आणखी बराच आध्यात्मिक प्रवास करावयाचा बाकी आहे , असे समजावे.

म्हणूनच संपूर्ण आंतरीक शांतीसाठी अंतर्मुख होऊन आत्मचिंतन करण्याची व ईश्वरी शक्तिशी एकरूप होण्याची आवश्यकता आहे.

त्यासाठी *सो अहम्* ध्यान तुम्हाला नक्कीच या यशस्वी व अंतिम पायरीपर्यंत घेऊन जाण्यासाठी उपयोगी ठरेल.

( एखाद्या सिध्द पुरूषाने जर तुमच्या डोक्यावर वरदहस्त ठेवला तर अशी स्थितप्रज्ञता तर मिळेलच मिळेल, शिवाय आयुष्यात जे कांही हवे ते सगळेच प्राप्त होईल.
पण अशा सिद्ध पुररूषांची भेट होणे पण भाग्यामध्ये असावे लागते.व गुप्त रूपाने समाजात राहणारे सिध्द पुरूष पण आपणास ओळखता आले पाहिजेत….
कर्म झोपलेले असेल तर देव तरी काय करणार ?
तुझे आहे तुजपाशी परी जागा चुकलाशी…)

*जय हरी विठ्ठल.*

*विनोदकुमार महाजन*

Related Post

Translate »
error: Content is protected !!