Fri. Oct 17th, 2025

संवेदनाशून्य

Spread the love

अजब गजब 🤫

दु:ख सांगीतले तर?
लागला भोगायला
सुख सांगीतले तर?
ऐश करतो
दूर रहावे तर?
माणुसकी शून्य
जवळ आले तर?
स्वार्थापोटी जवळ आला
कितीही प्रेम केले तर?
बदनामी अन् लाथाळ्या
विरोध केला तर?
माजलेला

अफलातून दुनियादारी
गजब कलियुगी न्याय

एकंदर काय तर?
कसंच जगू द्यायचं नाही
चारी बाजूने नींदा?

इथे शहाणे ही पागल होतील
अन् ? पागल ही आत्महत्या करतील

इथे तग धरून सुखाने
जगायचं असेल तर?
संवेदनशील नव्हे तर?
संवेदनाशून्य बनावं लागतं
बधीर बनून जगावं लागतं

👆🤫🥺😭🤔🤔🤔🤔🤔🤔🤔

विनोदकुमार महाजन

Related Post

Translate »
error: Content is protected !!