Sat. Nov 9th, 2024

येथे पाहिजेत जातीचे

Spread the love

*येथे पाहिजेत जातीचे !!*

✍️ लेखांक : – २५१८

@@@@@@@@@

ध्येयासाठी वेडे झालेले
ध्येयपुर्तीसाठी सर्वस्वाचे
बलिदान करणारे
धगधगता अग्नी अन् तेज असणारे
” क्रांतिवीर ”
आता भेटणे शक्य नाही .

स्वातंत्र्य प्राप्तीसाठी सर्वस्वाचे
बलिदान करणारे , सर्वस्व झोकून देणारे , प्रसंगी मृत्युची
सुध्दा पर्वा न करणारा
महान क्रांतिकारक निर्माण करणारा तो काळ ,
ते मंतरलेले दिवस , ते झपाटलेले दिवस केंव्हाच संपले आहेत .

ध्येयवेडे तरूण कुठेच दिसत नाहीत .
अंधाधूंद अन्
स्वार्धांध झालेले बरेच दिशाहीन ,
व्यसनाधीन तरूण जागोजागी दिसत आहेत .
स्वार्थ अन् धनासाठी , ऐशोआरामासाठी वाट्टेल त्या थराला जाणारा तरूण पावलोपावली निर्माण होतो आहे .

योग्यता , लायकी नसतानासुद्धा सरकारच्या बोकांडी बसून
मला हे पाहिजे , मला ते पाहिजे म्हणणारे बांडगूळं जागोजागी निर्माण होताहेत .

खरंच समाज भिकारी झाला का ?
हीन – दीन – लाचार – कंगाल – स्वाभीमानशून्य – हतबल – निस्तेज झाला का ?
देण्याची भावनाच संपली .
दातृत्वचं संपल .
परोपकार संपला .
सगळंच मला मला ?

परनिंदा , परपीड़ा यातच आसुरी आनंद वाढला ?
कुणी केलं एवढं सगळं भयानक ?
आकाशाएवढी विशाल मनाची माणसंच संपली ?
की षड्यंत्राने संपवली गेली ?
संस्कृती संपवण्यासाठी ?

दुर्देव देशाचे .

@@@@@@@@@

देव , देश अन् धर्मासाठी सर्वस्व झोकून देणारे धगधगते तेज असणारे क्रांतिकारी विचारांचे किती तरुण आज भेटतील ?
अशक्य वाटतंय ना ?

कशी निर्माण करायची अशी माणसं ?

@@@@@@@@@

खरंच ?
श्रीकृष्ण दुसरा श्रीकृष्ण निर्माण करू शकत नाही .
राजे शिवबा दुसरे शिवबा निर्माण करू शकत नाहीत .
सावरकर दुसरे सावरकर निर्माण करू शकत नाहीत .
सुभाषचंद्र बोस दुसरे सुभाषबाबू निर्माण करू शकत नाहीत .
स्वामी विवेकानंद दुसरे विवेकानंद निर्माण करू शकत नाहीत .

येथे पाहिजेत जातीचे .
ये-यागबाळ्यांचे काम नोहे .

असो .

आता गरज आहे ती नवसमाज निर्माणाची ?

@@@@@@@@@

पृथ्वीपर हम भी
” बहुत बडा खेला करने के लिए ही , ईश्वरी इच्छा से हम आये है !
हमें कौन रोकेगा ? ”
ऐसा अनेक पुण्यात्माएं कह रहे है ?

” वैश्विक क्रांती का बिगुल बज चुका है !!? ”

@@@@@@@@@

अधर्म का संपूर्ण नाश …
पापीयों का संपूर्ण विनाश …
उन्मादियों का सर्वनाश …
होकर रहेगा !?

@@@@@@@@@

*विश्व स्वधर्म सुर्ये पाहो !!*

नया युग आरंभ हो रहा है !?

@@@@@@@@@

विष्णु भगवान की जय !
हर हर महादेव !

@@@@@@@@@

*विनोदकुमार महाजन*

Related Post

Translate »
error: Content is protected !!