Tue. Dec 3rd, 2024
Spread the love

एखाद्याच्या घरात गुप्त रूपाने
प्रत्यक्ष देव रहात असतो.
कोणत्या व्यक्तिच्या आत देवत्व आहे हे समजत ही नसतं .
पण कर्म झोपलेली माणसं त्या देवाला ओळखून त्याला आनंदी ठेवायचं सोडून त्या देवतूल्य माणसांनासुध्दा नित्यनेमाने खेटराने मारत असतात.अन्
समाजात , पाव्हण्यारावळ्यात त्याच्या भयानक बदनाम्या करून त्याचं जगणचं मुश्कील करून टाकत असतात.
धर्म कार्यात सुध्दा त्याला सहकार्य करायचं , त्याच्या पाठीशी उभ रहायचं सोडून सतत त्याच्या ह्रदयावर क्रूर आघात करत असतात .

उदाहरणार्थ ?
एकनाथ महाराज आणी हरी पंडित .
हिरण्यकश्यपू आणी भक्त प्रल्हाद.
आणी अशी हजारो उदाहरणे.

ईश्वरी गुणसंपन्न महान राजे शिवबा सारखा थोर युगपुरुष ?
औरंगजेबासारखा महाभयानक राक्षस ही , शिवबांना नजरकैदेत ठेऊन सुध्दा संपवू शकला नाही.
पण ?
मात्र राजगडावर पोचल्यावर असं काय महाभयंकर षडयंत्र स्वकियांकडून घडलं की शिवबांचा अकाली मृत्यु झाला ?
म्हणजे ?
महाबलाढ्य शत्रु ही जे करू शकला नाही ते भयंकर पाप स्वकियांकडून घडलं ? ( जर राजांचा मृत्यु अनैसर्गिक असेल तर )

अशा अनेक भयानक प्रसंगामुळे हिंदू धर्माचे वारंवार भयंकर नुकसान झाले आहे.

अजूनही वेळ हातात आहे.
सुधरा.
एक व्हा.
धर्म संकट थांबवा आणी धर्म ग्लानी संपवा.

हरी ओम्

विनोदकुमार महाजन

Related Post

Translate »
error: Content is protected !!