Wed. Sep 18th, 2024

गजानन महाराज की जय !!!

Spread the love

गजानन महाराज आजही चमत्कार करतात.
माझा अनुभव सांगतो.
मी
गण गण गणात बोते
या दिव्य मंत्राचा दोन कोटी जप पुर्ण केला आहे.
गजानन महाराजांनी मला दर्शन, आशिर्वाद व वरदहस्त दिला आहे.

मी स्वप्नात गजानन महाराजांजवळ रडत होतो.
व असे म्हणत होतो की,
बाबा मला या कलिगाचा दाह सहन होत नाही. यापेक्षा मृत्यु बरा वाटतो.
कांहितरी महान ईश्वरी कार्य हातून व्हावे ही इच्छा आहे.

त्यावेळी गजानन महाराज
हात उंच करून,दोन्ही टाचा उंच करून,
फार मोठ्या आवाजात मला म्हणाले

फार मोठ्ठे नांव कमावशील.

पुन्हा थोडे दिवसांनी बाबांनी माझ्या डोक्यावर उजवा हात ठेवला व मला म्हणाले,

तुझे कार्य चालू झाले आहे.

गजानन महाराज की जय
गण गण गणात बोते

अंतरराष्ट्रीय पत्रकार,
विनोदकुमार महाजन

गणगण गणात बोते

आज चा दिवस सोमवार..
भगवान शिव यांचा वार…
भगवान शिव आणि श्री गजानन महाराज यांच्या त काही गोष्टींची लिंक आहे असे बहुतांना वाटते.
श्री गजानन महाराज यांचे काही बघता त्यांना दत्ताचा अवतार मानतात.
शेगाव जवळील वीट खेड या गावी श्रींनी परशुराम बापूंना चैत्र पौर्णिमेला दत्तप्रभू प्रकट करून दत्तप्रभू चे दर्शन कळविले होते.
श्री गजानन विजय ग्रंथ यात श्री गजानन महाराज हे समर्थ रामदास स्वामीचे अवतार असल्याचा उल्लेख आहे. बाळापुर च्या बाळकृष्ण रामदासी यांना महाराजांनी रामदास स्वामीचे दर्शन दिले
अमरावतीचे सत्पुरुष माऊली कर नारायण गुरु मनाचा नक्की श्री हे गणपतीच्या महान उपासक होते. श्रींना
गणपत बुवा असे म्हणत तर कोणी गण्या म्हणत.
कपिलधारा तीर्थक्षेत्री बाल गजाननाची बारा वर्षे तपश्चर्या केली तिथे त्यांनी स्वहस्ते गणपतीची मूर्ती स्थापन केली होती ती मूर्ती आजही तिथे आहे.
तसेच बारा वर्षे तपश्चर्या केल्याचा उल्लेख संगमरवरी दगडावर कोरून करून ठेवलेला आहे.
भक्त मंडळी म्हणतात की श्री गजानन महाराज पांडुरंगाचा अवतार होते. गावच्या बापू ना काळे यांस गजानन महाराजांनी पांडुरंगाच्या रूपात पंढरपूरला दर्शन दिल्याचा उल्लेख आहे.
काही मंडळी म्हणतात की श्री गजानन महाराज शिवशंकराचा अवतार होते.
अशी निरनिराळ्या लोकांचे मते आहेत पण हे नेमके कोणाचे अवतार होते हे सांगणे कठीण आहे.
श्री गजानन महाराज यांचा संबंध शिव शंकराची म्हणजे ज्या ठिकाणी शंकराचे स्थान देऊळ मूर्ती लिंग वगैरे आहे त्या ठिकाणी आला कसा
हे आपण बघूया.
श्री गजानन महाराज शेगावला आले ते सर्वप्रथम मोठ्याच्या महादेव मंदिरात.

कृष्णाजी पाटलाच्या मळ्यात शंकर जी च्या मंदिराशेजारी राहिले. पलंग जाळण्याची लीला याच ठिकाणी केली.

महाराज शेगावहूनकोणासही न सांगता
पिंपळगाव ला निघून गेले आणि तेथे शिव शंकराच्या मंदिरात ध्यान धारण करू लागले. नंतर बंकटलाल त्यांना शेगावला घेऊन आले.
महाराजांनी भास्कर पाटलास स्वहस्ते द्वारकेश वरला शिवलिंगाच्या मंदिरा शेजारीच समाधी करिता जागा निवडली.
या ठिकाणी असलेले शिवलिंग भगवान कृष्णाने स्थापन केल्याचा उल्लेख पुराणात आढळतो त्यावरून या स्थळाला द्वारकेश वर असे संबोधले जाते.
महाराज नेहमी शंकर जी चे मिराबाई ने गायलेले भजन चंदन चावल बेल की पत्तिया शिवजी के माथे धरो रे
म्हणत असे विजय ग्रंथाचा उल्लेख आहे.
भास्कर पाटलांनी देह सोडणे अगोदर त्यांना महाराज त्र्यंबकेश्वरांच्या दर्शनाला घेऊन आले.

महाराज सोमवती अमावस्याला स्नाना करिता आणि ओंकारेश्वर यांच्या दर्शनाकरिता ओंकारेश्वर येथे आले होते.

महाराज शेगाव पासून पस्तीस किलोमीटर अंतरावर वांगेशवर शिव मंदिर येथे येत. पूर्णा आणि नंदिनी त्या दोन नद्या उत्तर वाहिनी आहे तिचे करून शिव मंदिरात ध्यानधारणा करीत.
महाराज नागपूरला महाल भागातील रघुजी राजाच्या वाड्यात असताना घुजी राजा सर्व सहकार्‍यांना व सेवाधारी भक्तास घेऊन वाड्या शेजारी असलेल्या पाताळेश्वर शिव मंदिरात आले येथे काही वेळ ध्यान धारणा करून येथील मोठी पितळी घंटा राणी वाजवू लागले.
महाराज शेगाव ला प्रकट होण्याअगोदर नाशिकला देव मामलेदाराकडे दुखते यावर देव मामलेदार यांनी त्यांना अध्यात्माचे धडे दिले. देव मामलेदार ए शिवभक्त होतं.
देव मामलेदार देव विसर्जनानंतर त्यांच्या आरक्षित शिवपिंड आढळून आले. ते आजही त्यांच्या घरी देवघरात आहे.
शेगावला अवतीर्ण होण्याआधी त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील गिरडा या गावी शिव शंकराच्या लिंगा समोर तपश्चर्या केल्याचा उल्लेख जुन्या ग्रंथात आहे.

बाल गजानन शेगावला येण्याआधी नाशिकला होते नाशिकच्या विदर्भातील लाडका नांदगावचे भागवत कार बाळशास्त्री घाडगे हे भागवत पारायण करता आले होते त्यांची नजर तेजस्वी अशा बाल गजानन यांच्यावर पडली.
प्रेम पूर्वक विनंती करून लाड कारंजा ठेवून आले पण बाल गजानन शास्त्री सोबत त्यांच्या घरी न जाता ते एकटे निघाले आणि येथील ऋषी तलावाच्या काठावरील शिव मंदिरात येऊन ध्यान धारण करू लागले.
गजानन महाराज अकोट नरसिंग महाराज यांच्याकडे आले.
महाराज हे शिव शंकराचे भक्त होते त्यांनी अनेक वर्ष महादेवाची साधना करून महादेवाला प्रसन्न करून घेतले होते नरसिंग महाराजांकडे गजानन महाराज वर्ष होते अष्टसिद्धी प्राप्त उच्चकोटीचे योगी होते त्यांनी गजानन महाराजांना सर्व अष्टमहासिद्धी हस्तांतरित केल्या नंतर आपली लिहलेला आटोपली पण त्या अगोदर त्यांनी गजानन महाराजांचा सांगून ठेवले होते की मी देहलीला आटोपल्यानंतर तू शेगावला जा
कर्मा पूर्ण शेगाव आहे त्याप्रमाणे गजानन महाराज माग सप्तमी शनिवारी भर दुपारी शेगावला प्रगट झाले तारीख होती 23 फेब्रुवारी 1878.
आपली कर्मभूमी आणि समाधी भूमी शेगाव स्थान निवडले .
या गावाच्या पुढे येथील सुप्रसिद्ध शिव मंदिरामुळे शेवगाव असे म्हणत या गावचे पुढे शेगाव असे नामकरण झाले.
या सगळ्या गोष्टींचा विचार करतात
आपण ठरवायला हवे श्री गजानन महाराज कोणाचे अवतार होती.
ते कोणाचे अवतार असो आपल्या करताना एक अवतारी पुरुष भक्तांच्या कल्याणाकरिता अवतरले हे खरेच आहे.
आपण सगळे श्री गजानन महाराज
यांना दंडवत प्रमाण करून त्यांचे आशीर्वाद घेऊ या
गण गण गणात बोते.
श्री गजानन जय गजानन

Related Post

Translate »
error: Content is protected !!