षट्चक्र भेदन ते ईशत्व प्राप्ति
अंगात देव संचारणे म्हणजे काय १】प्रथमभाव-स्वेद :-
देवी देवतांचे मंत्र ,स्तोत्र,जप करताना ग्रंथ पठण करताना शरीराला घाम येतो अस्वस्थ वाटते हा प्रथम भाव. असा अनुभव येत असेल तर हा कुंडलीनी जागृती /संचार आदिचा पहीला टप्पा
२】दुसरा भाव-कंप :-
या भावात पोहचवलावर भक्ताला शरीराला कंप सुटतो.अचानक काही वाद्य घंटानाद किंवा नादब्रम्हाशी निगडीत आवाज ऐकले की शरीरात नकळतच कंप जाणवतात नाचावेसे जोरजोरात ओरडावेसे वाटते .
३】तिसरा भाव- रोमांच :-
ईष्ट देवी किंवा देवांचा जप करताना पोथी वाचताना चरीत्र ऐकताना किंवा एखाद्या देवीदेवतेचा श्रीविग्रह (मुर्ती)पाहुन अनुभव सांगताना शहारे आले तर हा तिसरा भाव समजवा.
४】चतुर्थ भाव- अश्रू :-
संकटसमयी अथवा देवी देवतांच्या आठवणीने हृदय भरून आले तर आनंदाश्रू येतात. हा भाव सेवेकऱ्याची हृदयाची शुद्धी करतो. अशा सेवेकऱ्याकडून त्या ईष्ट देवी देवतांची काव्य ही सहज निर्माण होते. खरे म्हणजे या भावात गेल्यावर सेवा काल वाढवायला हवा. गुरुमार्गदर्शनाने जप करायला हवा.अशी काही वर्ष साधना केली तर भक्त पंचम भावात प्रवेश करतो.
५】पंचम भाव -सत्वापत्ती :-
याभावात प्रवेश केल्यावर अनुसंधान जास्त वेळ टिकते. अंतर्गत ईश्वरीय संकेत मिळतात. साधक देवीमय होऊन जातो. त्यावर गुरुंच्या शक्तीपातान कुंडलीनी शक्तीचे भगवती शक्तीशी अनुसंधान होते. योग्य गुरु प्राप्त न झाल्यास साधक किंवा सर्व सामान्य माणसे चवथ्या भावापर्यंत या जन्मात पोहचतात बाकी पुढील जन्मात अध्यात्मिक प्रवास सुरु करतात.
६】षष्ट भाव-समाप्ती :-
या भावात प्रवेश झाल्यावर हळूहळू सुख दु:ख मान अपमान निंदा स्तुती सर्व समान वाटु लागतात. अभिमान अहंकार नष्ट व्हायला सुरुवात होते. सतगुण वाढू लागतात.शरीरातील कुंडलीनिवर देवी शक्तीचे अधिष्ठान असल्याने ईतरांच्या सांसारीक समस्यांवर सहज उपाय सांगण्याची प्रेरणा या षष्टम् भावात होते. (आणि सहाजिकच देवीमय झालेला साधक मद्य ,मांस ,किंवा अन्य सांसारीक भोगांची मागनी नक्कीच करणार नाही हे सुज्ञानी लक्षात घ्याव)
७】सप्तम भाव- असंसक्ती :-
जस की कोणत्याही प्रकारची आसक्ती न राहील्याने सातव्या भावात प्रवेश केल्यास देवतांची दर्शन,प्राकृतिक संकेत दैविक जगताशी-साक्षात्कार-संभाषण होतात. षट्चक्रे (पुर्ण किंडलिनी )जागरूक होतात-इतरांच्या भूत भविष्य समजत, बोललेले शब्द सत्य होतात. या भावात गुरु मार्गदर्शनाकडे दुर्लक्ष न करता स्वबळावर आपली प्रगती करावी लागते. व जन कल्याणाचे कार्य करावे.
८】अष्टमभाव-प्रलय :-
या भावात साधक ईश्वराशी एकरुप होतो. सिद्ध अवस्था प्राप्त होते. पुढील जन्मात पण ते सर्व विभागात काम करून जनकल्याणाचे कार्य करतात.या अष्टम् भावापर्यंत पोहचण्यासाठी खुप त्याग आणि ओढ आवश्यक आहे. जे या भावापर्यंत पोहोचतात ते योगी ब्रम्हज्ञानी म्हटले जातात.
असे आहे संचार क्रियेचे गुढ रहस्य ज्याचा कैक लोकांनी आपल्या सोईनुसार बाजार मांडुन मुळ संचाराची व्याख्या लोकांच्या मनात चुकीची रुजवलीये .
काही जण मला प्रश्न विचारतात की
💠 *देवी एकाच वेळी एवढ्या सर्वांच्या अंगात येते अगदी पुरुष असो वा स्त्री अस कस शक्य आहे ?*
-अहो देवी अंश स्वरुपात संचारीत होते ज्याची जैसी भक्ती त्यास तैसी प्रचिती , सुर्य एकच आहे पण किरण वेगवेगळी आहेत जो त्या किरणांचा सानिध्यात जाईल त्यावर सुर्यप्रकाश पडला अस आपन म्हणतो तस भगवती एक आहे तिच प्रत्येकाच्या शरीरात शक्ती रुपाने वास्तव्य आहे जर विश्वास नसेल तर काढून टाका जिवांच्या शरीरातुन शक्ती खाली काय राहील निर्जिव शरीर त्या शक्तीचा प्रताप अगाध आहे तिच्याशिवाय शिव देखिल शव आहे. शक्ती अंश अनेक आहेत ते एकाच वेळी असंख्यांच्या शरीरात दाखल होऊ शकतात.
संकलन : – विनोदकुमार महाजन