Thu. Sep 19th, 2024

प्लास्टिक बोटल टाळा,पर्यावरण सांभाळा,आरोग्य सांभाळा

Spread the love

पाणी बॉटल
“येथे थंडगार “बिसलरी ” मिळेल” अशी पाटी आपल्याला अगदी एखाद्या गजबजलेल्या शहरापासून ते अतिशय दुर्गम भागात असलेल्या पर्यटनस्थळीही पहायला भेटते. अगदी 200ml पासून या “बाटल्या/bottles” उपलब्ध असतात.बाहेर गेल्यावर बरेचजण पाणी विकत घेतात. अगदी स्टेटस symbol म्हणून सुद्धा काही लोक चार माणसात मोठेपणा म्हणून “बिसलरी ” मागवतात. आजकाल लग्नसमारंभात, काही कार्यक्रमात, नेत्यांच्या सभामध्ये या बॉटल सर्रास वाटल्या जातात. काही हॉटेल मध्ये साधं पाणी सुद्धा प्यायला मिळत नाही… पाणि पायचं असेल तर तुम्हाला एक “बिसलरी” विकत घ्यावी लागते.
या वापरल्या जाणाऱ्या सर्व बॉटल्स एकदाच वापरू शकतो. कारण त्याला वापरलं जाणार प्लास्टिक हे एकदा वापरण्यायोग्य असत. तुम्ही जर अशी बाटली रोजच्या वापरात ठेवत असाल तर ते देखील आरोग्यासाठी हानिकारक आहे.
या सर्व बॉटल recycle करण्यायोग्य असल्या तरी फारस तस करताना दिसत नाही. या बॉटल वर्षानुवर्षे कचऱ्याच्या ढिगात, नदी, ओढे,तलाव, समुद्र यामध्ये पडून राहतात. काहीवेळा तर प्राणीही असं प्लास्टिक चघळताना दिसतात. अर्थात ते त्यांच्या साठी घातकच आहे.
हे सर्व सांगायचं कारण म्हणजे आपण जी प्लास्टिक ची single use बाटली पाण्यासाठी किंवा शीतपेये पिण्यासाठी घेतो ती पर्यावणासाठी हानिकारक आहे.
प्लास्टिक चे दुष्परिणाम सांगण्यापेक्षा, दुष्परिणाम आपल्या सगळ्यांना माहित आहेत असं गृहीत धरून आपण उपयांवर बोलूया. मला सुचेलेले काही उपाय खालीलप्रमाणे
1)प्लास्टिक बाटली घेण टाळा – बाहेर जाताना शक्यतो स्वतः ची बाटली जवळ ठेवणं ही चांगली सवय आहे. शक्यतो बाहेर फिरायला जाताना आपण स्वतःची एक बॉटल जवळ ठेऊ शकतो जेणेकरून आपल्याला पाणि विकत घ्यावं लागणार नाही.
2)धातूची बाटली – रोज शाळेत, महाविद्यालयात, कामावर जाणारे यांच्याजवळ सामान्यपणे एक बॉटल असते. ती बाटली धातूची (steel किंवा तांबे ) याची वापरू शकतो. बाजारात अशा बाटल्या उपलब्ध आहेत. कुणाला गिफ्ट द्यायच असेल तर अशी बाटली आपण गिफ्ट करू शकतो.
3)काही वेळेस बाहेर कुठे फिरायला गेल्यावर स्वतःच पाणि बरोबर ठेवणं शक्य नसत अशावेळी पाणि विकत घ्यावाच लागत.अशावेळी ती बाटली तिकडेच त्या पर्यटन स्थळी न टाकता आपण घरी घेऊन येऊ शकतो जेणेकरून ते ठिकाण खराब होणार नाही. अशा बॉटलला कापून आपण छोट्या कुंड्या तयार करू शकतो.
4)पाणिपोई – उन्हाळ्यात काही सामाजिक संस्था पाणिपोई चालू करतात. त्या पाणिपोई कायम स्वरूपी असतील तर पाणि विकत घ्यायच्या एवजी पाणिपोईवर आपण बॉटल भरून घेऊ शकतो.

हे मला सुचेलेले काही उपाय आहेत. तुम्हाला काही अजून उपाय माहित असतील तर नक्की सांगा.

संकलन : – विनोदकुमार महाजन

Related Post

Translate »
error: Content is protected !!