Wed. Sep 18th, 2024

एक भावस्पर्शी कथा : – एक रूपयात मला खरंच देव भेटेल का हो ?

Spread the love

एक भावस्पर्शी कथा संकल्पना, माझे जेष्ठ बंधू,

ह.भ.प.श्री.प्रमोद महाजन

 

*तुमच्या दुकानात देव मिळेल कां?*
*पाच वर्षांचा एक छोटा मुलगा हातात एक रुपया घेऊन एका किराणा दुकानात जाऊन ऊभा राहिला.*

*दुकानदाराने त्या मुलास विचारले बाळा काय हवं तुला?*

*त्या मुलाने दुकानदारास विचारले*
*तुमच्या दुकानात देव मिळेल का?*

*हे ऐकून दुकानदार संतापला आणि त्या मुलावर जोराने ओरडून त्याने त्या मुलाला दुकानातून हाकलून दिले.*

*तो मुलगा दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या, असे करत करत ३० – ४० दुकाने फिरला.*

*प्रत्येक दुकाना समोर जाऊन एकच विचारायचा तुमच्या दुकानात देव मिळेल का?*

*शेवटच्या दुकानात एक म्हातारे आजोबा बसले होते, त्यांना पाहून ह्या लहान मुलाने विचारले, बाबा तुमच्या दुकानात देव मिळेल का?*

*त्या आजोबांनी विचारले बाळा तुझ्याकडे किती पैसे आहेत?*

*मुलाने प्रांजळपणाने सांगितले एक रुपया आहे माझ्याकडे. त्यांनी मुलाला जवळ घेत विचारले, बाळा तुला कशाला देव हवा आहे? तु देव विकत घेऊन करणार काय ?*

*प्रश्न ऐकून मुलाला खूप बरं वाटले. त्याच्या अशा पल्लवीत झाल्या, बाबा असे विचारतात म्हणजे नक्कीच यांच्या दुकानात देव असणार आहे.*

*तो म्हणाला ह्या जगात मला माझ्या आई शिवाय कोणीच नाही. रोज माझी आई कामाला जाते आणि माझ्यासाठी जेवण घेऊन येते. पण काल पासून ती हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहे. जर उद्या माझी आई मेली तर मला जेवण कोण देणार?*
*डॉक्टर म्हणाले की आता फक्त देवच तुझ्या आईला वाचवू शकतो.*
*म्हणून मी देव शोधतो आहे बाबा.*
*आहे ना तुमच्या दुकानांत देव?*

*दुकानदाराने त्या मुलाला विचारले किती पैसे आहेत तुझ्याकडे?*

*फक्त एक रुपया बाबा.*
*बरं, नको काळजी करू.*
*एक रुपयात देखील देव भेटेल!*

*दुकानदाराने तो एक रुपया घेतला आणि एक ग्लास फिल्टरचें पाणी त्या मुलाच्या हातात दिले आणि म्हणाला की हे पाणी घेऊन जा आणि तुझ्या आईला पाज. हे पाणी प्यायला दिले की आई तुझी ठीक होईल.*

*दुसऱ्या दिवशी एक स्पेशालिस्ट डॉक्टर हॉस्पिटल मध्ये आले आणि आईचें ऑपरेशन झाले. कांही दिवसात ती ठीक ही झाली.*

*डीस्चार्ज च्या दिवशी हॉस्पिटलचें बिल बघून ती बाई चक्रावली! पण डॉक्टर धीर देत म्हणाले. काळजी करू नका. एका वयस्कर व्यक्तीने हे सर्व बिल भरले आहे आणि सोबतच एक चिट्टीही ठेवली आहे.*

*चिठ्ठी उघडून वाचताच, माझे धन्यवाद मानू नकोस, तुला वाचवले ते परमेश्वरानेच. मी फक्त निमित्त होतो. तुला धन्यवाद द्यायचेच असतील तर आपल्या छोट्या अज्ञान बाळाला दे, जे बाळ एक रुपया घेऊन देव शोधत फिरत होते.*
*यालाच म्हणतात विश्वास …*
*देवाला शोधण्यासाठी करोडो रुपये दान करावे नाही लागत! श्रद्धा, भाव, विश्वास असला की एक रुपयातही देव मिळतो.*

*तात्पर्य:*
*भक्ती साधी भोळी असू दे. फक्त मनापासुन नामस्मरण केले की देव कोणत्या न कोणत्या रूपात येऊन नक्की मदत करतो ….!*

संकलन : – विनोदकुमार महाजन

Related Post

Translate »
error: Content is protected !!