Wed. Nov 5th, 2025
Spread the love

*जो सतत हवाहवासा…*
*वाटतो….!!*
✍️२७२१

—————

प्रेम म्हणजे नेमके काय असते….?
एखादा व्यक्ती सतत आपल्याजवळ असावा ,
त्याच्याशी मनमोकळेपणाने , हक्काने बोलावे , गप्पा माराव्या , आपले सगळे सुखदुःख त्याला सांगावे .

त्यानें हळुवारपणे आपल्या दु:खावर फूंकर घालावी , आपल्या प्रत्येक दु:खात त्याने खंबीर साथ द्यावी , आपण त्याच्यावरून व त्याने आपल्यावरून जीव ओवाळून टाकावा…

हेच तर ते खरं प्रेम असते .
शुध्द , पवित्र , निरपेक्ष .
नातं कोणतंही असो , प्रेम मात्र पवित्र असावं , त्यात धोका ,छल ,कपट नको ,
असं प्रेम सतत हवंहवंसं वाटतं….
अगदी सगळ्यांना…मला , तुम्हाला…सगळ्यांना .

पण साधारणतः घडतं काय तर ? आपण एखाद्यावर सतत ,चोविस तास पवित्र प्रेम करतो . आणी समोरचा रूक्ष निघतो .
त्याला आपल्या प्रेमाशी , मनाशी कांहीच घेणदेणं रहात नाही .

एकतर्फी प्रेम…
म्हणून प्रेम हे दोन्हीकडूनही असावं लागतं . तर त्याची तळमळ कळते , आत्मीयता कळते .

आणी अशी माणसं एकमेकाला आयुष्यभर हवीहवीशी वाटतात .

भावाभावाचं प्रेम , मित्रप्रेम ,नवरा बायकोचं प्रेम हे असंच असावं .

पण….?
कलियुगात असं शुध्द ,पवित्र , निर्भेळ प्रेम खरंच मिळतं का ? हा प्रश्न आहे . हवहवंसं वाटणारं प्रेम खरंच दुर्मीळ , दुरापास्त होतं चाललं आहे का ?

गुरू शिष्याचं प्रेम , भक्त भगवंताचं प्रेम , हेही असंचं सर्वश्रेष्ठ असतं .

म्हणूनच दोन्ही बाजूंनी उच्च कोटीचे प्रेम असेल तरच ते टिकतं , आणी तेचं हवंहवंसं वाटतं . आयुष्यभरासाठी असं प्रेम हे सर्वोच्चच राहतं .
त्यात स्वार्थ , मोह , दंभ , अहंकार कांहीही असतं नाही .

असं प्रेम जन्मोजन्मी टिकतं . अजरामर होतं .
अगदी राधाकृष्णासारखं .

नाहितर तो फक्त व्यवहार राहतो . तडजोड .
आयुष्यभरासाठी कुढ्या मनानं स्विकारलेली तडजोड .

सद्गुरूवर ,ईश्वरावरही असचं सतत ,पवित्र , निर्वाज्य ,निरपेक्ष प्रेम करावे .
समर्पित प्रेम .

म्हणजे तो ईश्वर ही भेटतोच भेटतो . आपल्या भेटीसाठी अगदी वेडापिसा होतो .

पण …?
त्याआधी आपण त्याच्यावर सुध्दा तेवढंच निरपेक्ष प्रेम केलचं पाहिजे .
आपल्याला तो सतत हवाहवासा वाटला पाहीजे .
एक क्षणही आपल्याला त्या ईश्वराशिवाय राहवलं नाही पाहीजे .
त्याच्या भेटीसाठी आपली सतत तडफड , तळमळ झाली पाहिजे .
अन्न पाणीही आपल्याला त्याच्या शिवाय गोड लागलं नाही पाहीजे .

अगदी श्रीकृष्ण अन् एकनाथांसारखं .

मग तो परमात्मा अशा प्रेमासाठी अगदी श्रीखंड्या बनूनही रहातो.

म्हणूनच उगीच नाही आपण राधाकृष्णाच्या अजरामर प्रेमाचं गुणगान करतं…

ईश्वराच्या प्रेमासाठी सतत अगदी वेडेपिसे व्हावे
प्रेमात डूंबून जावे.

मग तो परमात्मा तुम्हाला भेटेलचं भेटेल . चोवीस तास तुमची सेवाही करेल. तुमच्या वर शुध्द प्रेमही करेल .

हवहवंस प्रेम…

एकदा का त्याचं प्रेम मिळालं की मग मागण्यासारखं तुमच्या कडे काय राहीलं ?

ईश्वरावरं खरंच निरपेक्ष प्रेम तरी करून पहा .
त्याला वरपांगी प्रेम , नाटक , जमतंही नाही आणी आवडतं ही नाही .

राधेकृष्ण

*जय राधेकृष्ण…!*

🙏🙏🙏🕉🚩

*विनोदकुमार महाजन*

Related Post

Translate »
error: Content is protected !!