देव देव करणाऱ्यांच्याच मागे देव लागतो….
देव देव करणाऱ्यांच्याच मागे देव लागतो….असं बऱ्याचदा अनेकांकडून ऐकल असेल किंवा अनुभवलं असेलही
पण विचार केलाय का कधी की खरच देव आपल काही वाईट करत असतो वा करेल ?
या अनुषंगाने जर संचित कर्माचा, प्रारब्धाचा, भोगांचा विचार केला तर शास्त्र असं सांगत कि पुण्याचे फळ हे सुख आणी पापाच फळ हे दुख, हे निश्चितच आहे. पुढे -भोग हे फक्त भोगून संपतात मग आजवर जेवढ पाप केलं आहे त्याचे जे भोग भोगायला येणार आहेत ते भोगावेच लागणार आहेत. मग ते गत जन्मीचे असोत वा जन्मोन्जन्मीचे, भोगणे हे फळ संचिताचे. या विषयीचा फार छान दृष्टांत श्री गुरुचरित्रात, संदीपक आणी त्याच्या गुरु संबंधाने अगदी सुरुवातीसच आलाय. भोग पुढे ढकलू शकता पण संपूर्ण नष्ट करू शकत नाहीत हे मात्र नक्की.
जेंव्हा आपण भगवताची भक्ती करतो तेंव्हा भगवंत काय करतो तर आधी तुमचे जे भोग आहेत ना ते तुमच्या मार्गात आणतो आधी तुमचे भोग संपवतो आणी मग जवळ करतो. सोनं जस भट्टीमध्ये टाकल आणी त्याची गाळणी केली कि गाळ निघून जातो आणी शुद्ध सोन तेवढ राहत व मग त्यापासून जसा हवा तसा दागिना बनवता येतो, तसं जीवाला कर्माच्या भट्टीमध्ये टाकून भगवंत भोग रुपी गाळ बाजूला काढतो आणी मग जो सात्विक असा राहतो, त्याला भगवंत भक्त म्हणून स्वीकारतो.
म्हणून आयुष्यात कितीही कसल्याही अडचणी संकट दुख आली तरी कधीच त्याला सोडव असा म्हणू नका, फक्त हात जोडा आणी हे भोग समर्थपणे भोगण्याची ताकद दे इतक सांगा. तो भक्त वत्सल आहे, सोडव म्हणालात तर तो ते कर्म पुढे धकलीलही, पण पुन्हा केंव्हा तरी ते भोगावेच लागतात एवढ नक्की. भोग हे कर्क रोगाच्या गाठी प्रमाणे आहेत, डॉक्टर जोवर ती गाठ पूर्णपणे काढत नाही, तोवर तो आजार पुन्हा पुन्हा त्रास देतच राहतो. एकदा का ती गाठ मुळासकट निघाली कि पुन्हा उद्भवण्याचा संबंध नाही, तसे कर्म पूर्ण भोगून झाले कि पुन्हा त्रास करून घेण्याचा संबंधच नाही.
जर भोग आले, दुख आली, संकट आली कि खात्रीने समजा कि आपली भक्ती उदयास येते आहे, आणी लवकरच कर्मात्रीतून मुक्त होणार आहोत. मग अशा वेळेस अधिकाधिक भक्ती करा, निश्चितच लवकरच चांगले दिवस येतील..
*श्री स्वामी समर्थ*
संकलन : – विनोदकुमार महाजन