
*आम्ही स्वप्न वाटतो…!*
✍️ २८७६
*विनोदकुमार महाजन*
🩷🩷🩷🩷
होय मित्रांनो ,
आम्ही स्वप्न वाटतो.
सगळ्यांच्या सुखाची स्वप्ने पूर्ण व्हावी म्हणून आम्ही सुध्दा प्रयत्न करतो.
सगळ्यांच्या सुखासाठी ईश्वराकडे प्रार्थना करतो.
वामनराव पै यांची एक लोकप्रिय विश्व प्रार्थना आपणास माहितच आहे…
” हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे.सगळ्यांचं भलं कर , कल्याण कर.सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. ”
किती छान मन असेल ना वामनराव पै यांचे ?
दुसऱ्याच्या सुखासाठी प्रार्थना करायला सुध्दा खरंच मनाचं मोठेपण असावं लागतं.
दुसऱ्यांची सगळी स्वप्नं पूर्ण व्हावी, प्रत्येक जण आनंदात रहावा , अशी वेडी स्वप्न बघणारी वेडी माणसं ही या जगात नक्कीच असतात.
” स्वप्न वाटणारी वेडी माणसं…? ”
पण स्वार्थाच्या बाजारात आणी पैशाच्या नात्यामुळे हल्ली नाती पण
” रक्त बंबाळ झालेल्या ह्रदयासारखी झाली आहेत की काय ? ”
असे वाटते.
असो.
समाजातील एक लोकप्रिय कथा आहे.
” दोन प्रेमी असतात.ते दोघे एकमेकावर खरंखुरं प्रेम करतात.लग्नापुर्वी
आयुष्य एकत्र काढण्याच्या आणाभाका घेतात. ”
आणी ?
क्रूर नियती वेगळाच डाव टाकते.?
दोघांच्या ही आयुष्य भरासाठीच्या वाटा वेगवेगळ्या होतात.आणी ? आयुष्यभर पुन्हा कधिही न भेटण्यासाठी ते दोघे ही वेगळे होतात.?
एक वास्तव पण फिल्मी कथा ?
आणी मग चालू होतं ते आयुष्यभर लक्षात राहील असं एक फिल्मी गाणे…
” खूश रहे तू सदा…ये है मेरी दूवा…”
हे गाणं इथं मुद्दाम लिहायचं कारण असं की ,
” ते दोघे प्रेमी ? देहाने विभक्त झाले.पण मनाने , आत्म्याने एकच राहीले.आणी ? अगदी आयुष्यभरासाठी ?
एकमेकांच्या सुखासाठी ईश्वराकडे प्रार्थना करत राहीले. ”
मतलब …?
मतलब साफ है !
” दोघांचंही एकमेकावरील खरंखुरं , निस्सिम , अमर प्रेम.
त्या प्रेमातील कारूण्य आणी आर्तता. ”
मग हे असंच प्रेम आपण अगदी सगळ्यांवर भरभरून केलं , संकटात एकमेकांना उभारीचे व आधाराचे, मायेचे चार शब्द दिले तर ? त्याला , ज्याच्यावर प्रेम करतो त्याला ? स्वर्गीय आनंदच होईल ना हो ?
” आणी असं निस्सिम प्रेम करायला काय पैसा लागतो का हो ? नाही ना ? ”
आणी असं एकमेकांना आधार देणारं खरं प्रेमच ईश्वराला आवडते.
आणी मग ?
ईश्वर सुध्दा अशा खरंखुरं प्रेम करणा-या माणसांवर ? अगदी गुपचुपच प्रेम करायला लागतो.?
तो *श्रीकृष्ण* माहिती आहे ना आपल्याला ?
एकनाथ महाराज यांचे कडे गुप्त रूपाने *श्रीखंड्या* बनून , त्यांच्याकडे दररोज घागरीने पाणी भरायचा हो.अगदी दास होऊन.
प्रेमासाठी आणी *भक्तांसाठी दास* ?
भक्तांसाठी आणी प्रेमासाठी नोकर बनून राहणारा भगवंत खरंच किती मोठा असेल ?
” *देव भावाचा* *भुकेला…”*
पण…?
” मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव…”
असं कधी होईल का ?
ईश्वराला ही बोलता आलं पाहिजे.
नाहितर ?
नुसत्याच कोरड्या तिर्थयात्रा काय कामाच्या ?
म्हणूनच म्हणतो…
जगावर , समाजावर खरंखुरं प्रेम करत रहावं . आणी खरं प्रेम करूनही ? आपली कींमत शून्य ठरली ?धोके झालेच तर ? हिमालयात कायमचंच निघून जावं.अंगाला राख फासून.
तिथं भगवंत आपली नक्कीच वाट बघत असेल.अगदी वेडापिसा होऊन ?
मग ? आपण आणी आपला भगवंत ?
एकरूप होऊन जन्मोजन्मी एकत्र राहू या.कधिही वेगळं न होण्यासाठी ?
कदाचित…
” माणसं साथ सोडतील पण ? भगवंत जन्मोजन्मी साथ देईलच.”
आणी जन्मोजन्मी *साथ*
ही राहील.
” साथ साथ…सात जनम् तक…साथ रहने का…? इंन्सानों का जमाना और वचन अब…? कुछ काम का नहीं रहा है…? ”
*यहाँ भरौसा* ?
केवल और केवल ईश्वर का ही है…!
*प्रभू परमात्मा भगवान* *श्रीकृष्ण की* *जय*
👆🩷🕉️🙏
