Thu. Sep 19th, 2024

प्रेमात विरघळून जावं !!!

Spread the love

प्रेमात विरघळून जावं…!!!
( लेखांक : – २०८७ )

विनोदकुमार महाजन
——————————–
प्रेम !!!
किती पवित्र शब्द !
संपूर्ण ब्रम्हाण्डाला भेदण्याची शक्ती प्रेमामध्ये असते !
प्रेम ईश्वराच्या ह्रदयात निर्माण होतं !
म्हणून प्रेम हे अमृत असतं !

म्हणूनच ते पवित्र असतं,निष्पाप असतं,निष्कलंक असतं !
स्वर्गीय अमृतासमान !
पण त्याच्या मध्ये शुध्दत्व असावं !
शंभर नंबरी सोन्यासारखं !
निष्कपट !
स्वार्थाचा त्यात जराही लवलेशही नसावा !
प्रेमात स्वार्थ आला की तो व्यवहार होतो !
आणी प्रेमात व्यवहार कधीही नसतो !
माझं तुझं नसतो !
ते समर्पित असतं !

म्हणूनच प्रेमात अगदी विरघळून जावं !
मग ते नातं कोणतही असो !
गुरु शिष्याच असो,
भक्त भगवंताच असो,
पती पत्नीच असो,
भावा भावाच असो,
बहिण भावाच असो,
अथवा दोन मित्रांच असो !

धन वैभव, मोह माया,यश किर्ती यात खरं समाधान असतं का हो ?
याच्याही पलीकडे असतं ते दिव्यत्व,भव्यत्व अन् ईशत्व !

एकमेकावर खरंच प्रेम एवढं करावं ,की त्या प्रेमामध्ये विरघळून जावं,एकरूप व्हावं !

खूप दूर जरी गेलं,
आत्म्याने देहत्याग जरी केला,
तरी आत्म्याला दिव्य प्रेमाची दिव्य अनुभूती मिळावी !
अन् ते पवित्र प्रेम पुरं करण्यासाठी, आत्म्याने सुध्दा पुन्हा ….
देह बदलून यावं !
एवढी प्रेमाची शक्ती असावी !

भगवंतावर सुध्दा अस्स्…प्रेम करावं !
सद्गुरू वर सुध्दा अस्स्…प्रेम करावं !
स्वत:च अस्तित्व विसरून जावं !
संपूर्ण समर्पित प्रेम असावं !
प्रेमामध्ये स्वत:ला झोकून द्यावं !
दोन देह,आत्मा एक !
असं प्रेमात विरघळून जावं !

अशा प्रेमाचा भगवंत ही खरंच भुकेला असतो हो !
अशा प्रेमासाठी अगदी वेडापिसा होतो तो !
दास बनून राहतो तो अशा प्रेमासाठी !

प्रत्यक्ष परमात्मा श्रीकृष्ण
एकनाथांच्या प्रेमासाठी वेडा झाला,अन् चक्क श्रीखंड्या बनून नाथांघरी पाणी वाहीलं हो त्यानं !
जनाबाई बरोबर कामं केली !
चोखामेळ्याची ढोरं ओढली हो त्यानं !
अर्जुनाचे घोडे धुतले !
प्रेमासाठी वेडा वेडा झाला भगवंत !
देव भावाचा भुकेला !
गंध,माळा,टिळा,आरती,नैवेद्य, दक्षिणा कांही कांही लागत नाही त्याला !
गंध,माळा,टिळा ही तर प्राथमिकता आहे !
भगवंताच्या जवळ जाण्याची !
त्याच्याशी एकरूप होण्याची !

हातात सुदर्शन चक्र घेऊन दुर्जनांचा कर्दनकाळ ठरलेला, कर्तव्य कठोर कृष्ण,
भक्तासाठी मात्र वेडा होतो !

अहो,प्रेम करून तरी बघा त्या भगवंतावर !
त्यासाठी तुमचं मन तरल हवं,संवेदनशील हवं !

खोटं,कपटी,नाटकी,स्वार्थी प्रेमही कळतं बर का त्याला !
तो ओळखतो बरं का सगळं!
असल्या नाटकी प्रेमापासून तो दूर पळतो !
कारण तो अंतर्यामी आहे !

तुम्ही केलंय का असं खरखुर प्रेम कधी ?
केलंय का असं प्रेम कुणावर ?
केलयं का असं खरंखुरं प्रेम भगवंतावर ?

कदाचित माणसापासून धोके मिळतील हो !
पण भगवंतापासुन धोका नाही मिळणार !
पण त्यासाठी आपणही त्याच्या प्रेमाशी एकरूप व्हावं,त्याच्या प्रेमामध्ये विरघळून जावं,स्वतःच अस्तित्व ही विसरावं,त्याच्या प्रेमासाठी आपणही रात्रंदिवस वेडपिसं व्हावं !

खरंच अशा प्रेमामध्ये जादू असते !
जीवनचं पालटून जातं अशा प्रेमामुळे !
आयुष्याला बहार येते !

आणी सगळं आयुष्यचं नवचैतन्यानं भरून जातं !

बघा मित्रांनो,
असं खरखुर प्रेम करायला जमतयं का ते ?

आणी द्वेष – मत्सर ?
राक्षसांच्या आणी दुष्टांच्या ह्रदयातून निर्माण झालेलं जालीम विष !
भयंकर जालीम जहर !
म्हणूनच दुष्टांची सावली सुध्दा पडू देऊ नये अंगावर !
विश्वासघात हा द्वेषाचाच दुसरा भाऊ !
म्हणून द्वेष करणाऱ्या, विश्वासघातकी माणसापासून हजारों पावलं दूर जावं !
सदैव हजारो पावलं दूर रहावं !
अन्यथा दुष्टांच्या संगतीत आयुष्यचं पार होरपळून,करपून जातं होतं हो !
म्हणून सदैव दुष्टांच्या सावलीपासून सुध्दा दूर जावं !

अन् दिव्य प्रेम करणाऱ्या व्यक्तीच्या, सत्पुरूषाच्या निरंतर सावलीत रहावं !
अन् तिथेच रमावं !
सत्पुरूषांच्या सावलीतच उभं आयुष्य सरावं !

असं मागणं भगवंताला करावं !

असं हे प्रेम अन् द्वेषाचं आयुष्याचं गणीत आहे !

ज्याला प्रेमामृत मिळालं तो भाग्यवान !
अन् ज्याला द्वेषाचं भयंकर, जालीम जहर मिळालं ?
त्यांच आयुष्याचं गणीत ?
हुकलं…!

हरी ओम्

बाकी पुढच्या लेखात

Related Post

Translate »
error: Content is protected !!