Spread the love

*मानाच्या गणपती अनोखा उपक्रम*

छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला ३५० वर्ष पूर्ण झाले आहेत.छत्रपतींनी मुघल पातशाही उलथून लावत हिंदूचे स्वराज्य स्थापन करून हिंदूंना गुलामगरीतून मुक्त केले. हा थोर विचार मनात जागृत करणाऱ्या आई जिजाऊ यांचे आपल्या सर्वांवर ऋण आहेत.आजही समाजात काम करत असताना प्रत्येक स्त्री ही शक्ती चे केंद्र होऊन जिजाऊ मा साहेबांचा वारसा जपत आहे.
सीता राम , राधा – कृष्ण य प्रमाणेच हिंदू धर्मात स्त्री शक्ती ला प्रथम स्थान आहे . अश्या शक्ती ची पूजा करून ऋण व्यक्त करण्याचा कार्यक्रम महाराष्ट्राचा मानाचा तिसरा गणपती असलेला राजगुरुनगर मधील मानाचा पहिला गणपती मोती चौकाने आयोजित केला. सदर कार्यक्रमात पोलीस, वकील, डॉक्टर,शिक्षक,कला , क्रीडा,धार्मिक,सामाजिक क्षेत्रातील व मोती चौकातील एकूण ७५ स्त्री शक्ती यांच्या हस्ते संध्याकाळीची आरती झाली.पोलीस उपनरीक्षक घाटे मॅडम यांनी महिला सुरक्षा,सीमा ताई आनंदे यांनी हिंदू साम्राज्य दिन याबद्दल माहिती दिली.

 

वृत्त संकलन : – गिरीश चावरे ,राजगुरु नगर

Translate »
error: Content is protected !!